• Home
  • राजकारण
  • जळगावात शिंदे गटाने फिरवली भाकरी; जिल्हाप्रमुखपदी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती !
Image

जळगावात शिंदे गटाने फिरवली भाकरी; जिल्हाप्रमुखपदी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती !

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२५ । विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांकडून संघटनात्मक बांधणीला महत्त्व दिले जाते आहे. शिवसेनेच्या (Shiv Sena) ठाकरे गट पाठोपाठ शिंदे गटातनेही भाकरी फिरवली आहे. जिल्हाप्रमुखपदी दोन महिन्यापूर्वीच पक्षात आलेले विष्णू भंगाळे (Vishnu Bhangale) यांची नियुक्ती करण्यात आली. तर मावळते जिल्हाप्रमुख नीलेश पाटील यांच्यावर सहसंपर्क प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभा निवडणूक आटोपताच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. संघटन मजबूत असेल तर तळागाळापर्यंत पक्षाची कामे पोहोचवणे शक्य असते. त्यामुळे राज्यभरात नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असे संकेत अलिकडे मिळाले होते.

त्यानुसार जळगाव जिल्ह्यातही पक्षांतर्गत बदलाचे वारे जोरात सुरू झाले होते. जळगाव जिल्हाप्रमुख नीलेश पाटील यांच्यावर सहसंपर्क प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे तर नीलेश पाटील यांच्या जागेवर ठाकरे गटात जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळलेले विष्णु भंगाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.