जळगाव लाईव्ह न्यूज । ग्रामीण महाराष्ट्रासाठी दळणवळणाचे मुख्य साधन असलेली लालपरी आता कात टाकणार आहे. एसटी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या पाच हजार साध्या बस खरेदी करणार येणार असून यासाठी महामंडळांतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्यात येणार आहे, असा निर्णय परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. यामुळे प्रवाशांना आता बसस्थानकात बसची वाट पहावी लागणार नाही. एसटी स्टॅन्डवर गेल्याबरोबर प्रवाशाला एसटी बस मिळणार आहे.
तसेच महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीने भाडेतत्त्वावर बसेस न घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही त्यांनी घेतला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. तसेच जाहिरातीमधून एसटी महामंडळाला दरवर्षी १०० कोटींचे उत्पन्न मिळण्याचे नियोजनही करण्यात आले.
राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसला टोल माफी मिळावी, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचेही बैठकीत ठरले. तसेच आगाराला मिळणाऱ्या डिझेलवर व्हॅट सूट मिळावी, अशी मागणीही सरकारकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला.
काय घेतले निर्णय?
दरवर्षी पाच हजार नव्या साध्या बसेस खरेदी करणार.
कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या सात तारखेला होणार.
प्रत्येक आगाराच चार्जिंग स्टेशन उभारणार.
एसटी महामंडळ इलेक्ट्रिक बसही खरेदी करणार.
स्क्रॅब बसेसची संख्या बघून नव्या बस खरेदी होणार.
नव्या बसेसवर तिन्ही बाजूने डिजीटल जाहिरात करता येणार.